मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेशही दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर भाजपा नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी मागील आठवड्यात रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. केंद्रातील भाजप नेत्यांनीही अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. उच्च न्यायालयानंही अर्णब यांना तातडीने जामीन नाकारला होता. त्यानंतर अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.

आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे, आदरणीय सुप्रीम कोर्ट… कायद्याचं राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

राम कदम यांनीही एक ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुस्कटात मारलेली सणसणीत चपराक, सर्वोच्च न्याय पालिकेचा निर्णय! महाविकास आघाडी सरकारने देशाची माफी मागावी, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा मैलाचा दगड ठरेल. ठाकरे सरकारचे डोके ठिकाणावर येईल अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारने आता तरी सूडबुद्धीने वागणे बंद करावे, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here