>> आपल्या नागरिकांचे कष्ट आहे, आपल्या देशाच्या मातीचा सुगंध आहे अशा स्थानिक वस्तू विकत घ्या. लोकल फॉर व्होकल व्हा, मोदींचे जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना आवाहन करत भाषण संपवले
>> दिवाळीत आपली काळजी घ्या आणि आपल्यांची काळजी घ्या. करोनापासून सावध राहाः
>> मला धमकी देण्याची अजिबात गरज नाही, याचं उत्तर जनता देईलः पंतप्रधान मोदी
>> लोकशाहीत हत्यांचा खेळ करून कुणी मत मिळवू शकत नाही, मोदींचा ममता बॅनर्जींना इशारा
>> काही पक्षांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येची सुपारी घेतलीयः पंतप्रधान मोदी
>> जे भाजपला पराभूत करू शकत नाही, ते कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत, पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींना इशारा
>> कार्यकर्त्यांच्या तप, त्याग आणि तपस्येमुळे भाजपचा विकासः पंतप्रधान मोदी
>> तरुणांनी भाजपमध्ये यावं आणि देशसेवा करावी. आपली स्वप्नं आणि संकल्प पूर्ण करावी, पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन
>> देशातील एका मोठा ऐतिहासिक राजकीय पक्ष आता फक्त घराण्यापुरताच मर्यादीत झाला आहे, मोदींचा काँग्रेसला टोला
>> काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत राजकीय पक्षांच्या घराणेशाचं जाळ लोकशाहीसाठी धोका बनत आहे. हे देशातील तरुण जाणून आहेः पंतप्रधान मोदी
>> भाजप आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करणारचः पंतप्रधान मोदी
>> नितशकुमारांच्या नेतृत्वात बिहारचा विकास केला जाईलः पंतप्रधान मोदी
>> भाजला सायलेंट व्होटरचा आशीर्वाद. सर्वा मात, भगिनी आणि मुलींना आदरपूर्वक अभिवादन करतोः पंतप्रधान मोदी
>> भाजपच्या शासनात महिलांना सन्मान मिळतो आणि सुरक्षा मिळते म्हणूनच त्या भाजपच्या सायलेंट व्होटर आहेतः पंतप्रधान मोदी
>> भाजपकडे सायलेंट व्होटर, हा व्होटरच भाजपला सतत मतदान करतोय. हा व्होटर आहे देशाच्या माता, भगिनी आणि महिलाः पंतप्रधान मोदी
>> बिहारवासी पारखीपण आहेत आणि जागरूक आहेत, हे निवडणुकीतून जनतेने दाखवून दिलं आहेः पंतप्रधान मोदी
>> बिहारच्या जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहेः पंतप्रधान मोदी
>> बिहारच्या जनतेने दिलेले स्पष्ट बहुमत म्हणजे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र आहेः पंतप्रधान
>> मध्य प्रदेश, गुजरात, बिहारमध्ये भाजपवर जनतेने विश्वास दाखवला आहे. भाजपच्या या यशामागे त्यांच्या सरकारचे सुशासन आहेः पंतप्रधान मोदी
>> शेतकरी आणि मजुरांचा भाजपवर विश्वास आहे. जनतेचा विश्वास हा आपल्यासाठी सर्वात मोठी पूंजी आहेः पंतप्रधान मोदी
>> देशातील तरुणांचा सर्वाधिक विश्वास भाजप आहे. दलित, पीडित आणि शोषितांचा आधार भाजप आहे. देशातील मध्य वर्गाचे स्वप्न भाजप पूर्ण करत आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या गौरवासाठी भाजपवर विश्वास केला जातोयः पंतप्रधान मोदी
>> भाजप देशात हिताचे आणि जनतेच्या हिताचेच काम करेलः पंतप्रधान मोदी
>> भाजपने आणि एनडीएने देश आणि जनतेच्या विकासाचे लक्ष्य ठेवले आहेः पंतप्रधान मोदी
>> २१ व्या शतकात देशाचे राजकारण फक्त विकासाच्या मुद्दावर चालेल, हे जनतेने निश्चित केले आहेः पंतप्रधान मोदी
>> देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच यापुढे निवडून दिले जाईल, असा संदेश बिहार निवडणुकीतून जनतेने दिलाः पंतप्रधान मोदी
>> बिहारमध्ये निवडणुकीत आधी बूथ लुटला आणि हल्ल्यांच्या घटना होत होत्या. आता किती टक्के मतदान वाढलं याचं वृत्त दिलं जातं. हाच बिहारमधील मोठा बदल आहेः पंतप्रधान मोदी
>> नड्डाजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मोदींनी केले नड्डांचे कौतुक
>> भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या परिश्रमामुळे बिहारममध्ये भाजप आणि एनडीएचा विजयः पंतप्रधान मोदी
>> करोना संकटातही जनतेने मोठ्या हिंमतीने निवडणुकीत सहभागी होऊ देशाच्या लोकशाहीची ताकद दाखवून दिलीयः पंतप्रधान मोदी
>> जनतेचे आभार व्यक्त करतो. निवडणुकीत भाजपचा विजयाबद्दलच नव्हे तर लोकशाहीचा बळकट केल्याबद्दल जनतेचे खूप खूप आभारः पंतप्रधान मोदी
>> बिहारमध्ये निवडणुती का बा.. का बा..? असं विचारलं गेलं. ईबा ईबा.. तर विकास बा… असं उत्तर जनतेने दिलंः नड्डा
>> बिहारच्या जनतेने गुंडाराजच्या ऐवजी विकासराजला पसंती दिलीः नड्डा
>> पंतप्रधान मोदींच्या कमांवर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केले आहेः नड्डा
>> करोना संकटात फक्त आरोग्यच नव्हे तर आर्थिक पातळीवरही पंतप्रधान मोदींनी गरीबांसाठी काम केले, असं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलंः नड्डा
>> बिहारमधील यशाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदनः नड्डा
>> विधानसभा निवडणुकीतील विजयबद्दल बिहारच्या जनतेचे आभारः नड्डा
>> बिहारपासून ते तेलंगण, गुजरात आणि लडाखपर्यंत मतदारांना पंतप्रधान मोदीच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहेः नड्डा
>> भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले पंतप्रधान मोदींचे स्वागत
>> पंतप्रधान मोदी लवकरच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
>> पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले, मोदींचे पक्ष कार्यकर्त्यांना अभिवादन
>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजप मुख्यालयात पोहोचले, थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी येणार
>> दिल्लीत भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, जल्लोष
>> संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मुख्यालयात पोहोचले
>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजप मुख्यालयात पोहोचले
>> दिल्लीत भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार
>> भाजप मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत
>> बिहारमधील विजयाचे दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात सेलिब्रेशन
>> बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय, महाआघाडीचा पराभव
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times