वाचा:
पत्रकार अर्णब गोस्वामी व अन्य दोन आरोपींना अलिबाग येथील दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. १८ नोव्हेंबर रोजी या कोठडीची मुदत संपणार होती. मात्र कोर्टाच्या या आदेशाला अर्णब व अन्य आरोपींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. तिथे जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, हायकोर्टात दिलासा मिळू न शकल्याने अर्णब यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
वाचा:
अर्णब यांच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. संपूर्ण प्रकरणात कोणताही हस्तक्षेप न करता केवळ जामीन अर्जावर खंडपीठाने फैसला दिला व अर्णब गोस्वामींसह इतर दोन्ही आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आदेशाची प्रत पोहचताच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अर्णब यांना तळोजा कारागृहातून सोडण्यात आले आहे. अर्णब यांच्यासह अन्य दोन आरोपींचीही कारागृहातून मुक्तता झाली आहे.
वाचा:
दरम्यान, अर्णब यांनी कारागृहाबाहेर एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच केले. अर्णब यांच्या सुटकेवेळी कारागृहाबाहेर खूप मोठी गर्दी जमा झाली होती. कारागृहातून बाहेर पडताच अर्णब यांनी व्हिक्ट्री साइन दाखवले. हात उंचावत ते जोरजोरात वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत होते. काहींनी त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षावही केला. ही गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. गर्दी नियंत्रणात आणताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. जामिनासाठी मी सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे. हा भारतीयांचा विजय आहे, असे यावेळी अर्णब गोस्वामी यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times