कोट्टूर: श्रीकुट्टीने आपला पहिलाच वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. हत्तीने आपल्या केसांमध्ये एक फूल माळत रविवारी केरळमधील हत्ती पुनर्वसन केंद्रात वाढदिवसाचा केक खाल्ला. श्रीकुट्टीच्या वाढदिवाच्या पार्टीत १५ इतर हत्ती आणि काही माणसे देखील सहभागी झाली. सोशल मीडियावर या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रीकुट्टीला एका जंगलात गंभीर दुखापतीतून वाचवण्यात आले होते. दुर्घटना घडली तेव्हा अवघ्या दोन दिवसांची होती.

श्रीकुट्टीची जीवंत राहण्याची शक्यताही कमीच होती, मात्र मुख्य वन पशु चिकित्सा अधिकारी (आरडीटी) डॉ. ईस्वरन यांनी श्रीकुट्टीची विशेष काळजी घेतली आणि तिला बरे केले. केळे आणि नारळाच्या पाण्याच्या आरोग्यदायी आहाराबरोबरच भरपूर प्रेम आणि देखभाल केल्यानंतर श्रीकुट्टी पूर्णपणे बरी झाली.

श्रीकुट्टीच्या पहिल्याच वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोत तिच्यासोबत डॉ. ईस्वरन देखील दिसत आहेत. वृत्तसंस्था एनआयएने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओने दर्शकांना आकर्षित केले.

एका युजरने लिहिले, ‘श्रीकुट्टीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या पार्टीत आम्ही देखील सहभागी होऊ. मत तो करोनाचा काळ असो किंवा आणखी कसला. आम्ही आतापासूनच प्लानिंग करत आहोत.’

श्रीकुट्टीने आपल्या वाढदिवसानिमित्त डोक्यावर एक पिवळ्या रंगाचे फूल घातले होते, असे एका यूजरने म्हटले आहे.

जेव्हा श्रीकुट्टी सापडली त्यावेळी तिच्या एका पायाला गंभीर जखम झाली होती. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली असणार आणि त्यामुळे या जखमा झाल्या असाव्यात. शेवटी ती आपल्या आई-वडिलांपासून वेगळी झाली. त्यावेळी श्रीकुट्टी तीनच आठवड्यांची होती. तिची वाचण्याची शक्यता फक्त ४० टक्केच होती, असे उप वन्यजीव वॉर्डन सतीशान एन. व्ही. यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

सुदैवाने श्रीकुट्टी केवळ वाचली असे नाही, तिची आता चांगली वाढ देखील होत आहे. श्रीकुट्टीला वाढदिवसानिमित्त एक शाल देखील भेट दिली गेली. या बरोबरच तांदुळ आणि नाचणीपासून तयार करण्यात आलेला केक बनवून तिला खायला दिले गेला.सुदैवाने श्रीकुट्टी केवळ वाचली असे नाही, तिची आता चांगली वाढ देखील होत आहे. श्रीकुट्टीला वाढदिवसानिमित्त एक शाल देखील भेट दिली गेली. या बरोबरच तांदुळ आणि नाचणीपासून तयार करण्यात आलेला केक बनवून तिला खायला दिले गेला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here