मुंबई : रांची या लहान शहरातून येऊन क्रिकेट विश्वात आपला अमीट ठसा उमटवणारा महेंद्रसिंग धोनी आता मुंबईकर होणार असल्याचे समजते आहे. धोनीने मुंबईमध्ये एक घर बुक केले आहे. त्यामुळे धोनी आता रांचीहून थेट मुंबईला राहायला येणार असल्याचे समजते आहे.

धोनीची पत्नी साक्षीने आपल्या मुंबईतील घराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर तिने काही कमेंट्ही केल्या आहेत. धोनीच्या या घराचे काम सध्याच्या घडीला सुरु आहे. पण लकरच काम पूर्ण झाल्यावर धोनी मुंबईत स्थायिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण धोनी हा मुंबईमध्ये स्थायिक का होऊ शकतो, जाणून घ्या कारण…

महेंद्रसिंग धोनीचे एक मीडिया पब्लिकेशन आहे, याचे नाव ‘धोनी एंटरटेनमेंट’ असे आहे. धोनीची पत्नी साक्षी ही या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. या प्रोडक्शन हाऊसमध्ये धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांना चांगलाच रस आहे. पण ही सर्व कामं मुंबईतून जास्त प्रमाणात होत असतात. त्यामुळे धोनीने रांचीहून मुंबईला राहण्याचा विचार केला असावा, असे म्हटले जात आहे. पण याबाबत धोनी किंवा त्याची पत्नी साक्षी यांनी मात्र कोणतीही माहिती दिलेली नाही.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण तरीही त्याला मिळणाऱ्या जाहीरातींमध्ये कुठलीही घट झालेली पाहायला मिळत नाही. धोनी सध्याच्या घडीला ७६० कोटी रुपये वर्षाला कमावतो, असे म्हटले जाते. जाहिराती आणि अन्य कोणत्याही ठिकाणी जायचे असल्याचे मुंबई हे सर्वात जास्त सोयीचे शहर मानले जाते. त्याचबरोबर बॉलीवूडही मुंबईतच आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहता धोनी आपल्या कुटुंबियांसह मुंबईत राहायला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कारण धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर तो आपला उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबई हे शहर त्याच्यासाठी सोयीचे ठरू शकते. त्यामुळेच धोनी रांची सोडू मुंबईला राहायला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here