वाचा:
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला. बैठकील महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री , आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. करोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसेच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, मोहीम यासारखे चांगले व अभिनव निर्णय महाराष्ट्राने घेतले आहेत. हे निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.
वाचा:
राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळण्याची मागणी यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. त्यावर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत करोनाविषयक तपासणी व जनजागृती करता आल्याने त्याचा प्रभावी परिणाम दिसून येत असल्याची माहिती टोपे यांनी बैठकीत दिली. दिवाळी सण, हिवाळा यापार्श्वभूमीवर शासन घेत असलेल्या खबरदारी विषयीही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील करोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण कमी झाले आहेत. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारीही घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
राज्याचा करोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स नेमण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयस्तरावर इन्स्टिट्युशनल डेथ ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय लवकर निदान लवकर उपचार या सूत्रावर भर दिला जात असल्याचेही टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times