नागपूर: सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे वेतन काढण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या वस्त्रोद्योग विभागातील यांच्या स्वीय सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. या कारवाईमुळे सहकार व वस्त्रोद्योग विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ( Latest News Updates )

(वय ५७),असे अटकेतील स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. सेक्युरिटी एजन्सीच्या संचालकाने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. वर्मा यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. वृत्त लिहिपर्यंत त्यांच्याकडे काय आढळले हे कळू शकले नाही.

वाचा:

नागपुरातील येथे संचालकाने आठ सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीतील ३४ लाख ५५ हजार ९४४ रुपये तसेच डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० यादरम्यानचे नऊ लाख ४६ हजार ८३२ रुपये वेतन थकीत होते. थकीत वेतनाचे बिल काढण्यासाठी संचालकाने सिव्हिल लाइन्समधील वस्त्रोद्योग आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज केला. त्यानंतर त्यांनी आयुक्तांचे स्वीय सहाय्यक नितीन वर्मा यांची भेट घेतली असता वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी वर्मा यांनी संचालकाला पाच लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, एवढी रक्कम देण्यास संचालकाने असमर्थता दर्शविली.

वाचा:

पाच लाख रुपये दिल्याशिवाय वेतनाचे बिल काढणार नाही, असे वर्मा यांनी संचालकाला सांगितले. त्यानंतर संचालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्याआधारे अधीक्षक , अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भावना धुमाळे, हेडकॉन्स्टेबल सुनील कळंबे, शिपाई लक्ष्मण परतेती, राहुल बारई, गीता यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात वर्मा यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी एसीबीने सदर पोलीस स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून वर्मा यांना अटक केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here