आपल्या भाषणात मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांचा उल्लेख केला. जे लोक लोकशाही पद्धतीने आमचा मुकाबला करू शकत नाहीत, असे काही लोक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत, असे कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले.
‘देशाच्या काही भागांमध्ये सुरू आहे भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा खेळ’
पश्चिम बंगालचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्यानंतर आपले मनसुबे पूर्ण होतील असे देशातील काही भागांमधील काही लोकांना वाटते. मी त्या सर्वांना आग्रहपूर्वक सांगतो, मी इशारा देत नाही, ते काम जनताच करेल.’
‘मृत्यूचा खेळ खेळून लोकशाही चालत नाही, भिंतीवर लिहिलेले हे शब्द वाचा’
निवडणुका येतात आणि जातात, कधी हा बसेल कधी तो बसेल मात्र मृत्यूचा खेळ खेळून लोकशाही चालत नाही आणि मृत्यूचा खेळ खेळून कोणी मते मिळवू शकणार नाही, भिंतीवर लिहिलेले हे शब्द वाचा, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले.
‘बिहारमध्ये सत्य जिंकले आहे, विश्वास जिंकला आहे’
बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. मोदी म्हणाले, ‘बिहारमध्ये विकासाच्या कामांचा विजय झाला आहे. बिहारमध्ये सत्य जिंकले आहे, विश्वास जिंकला आहे. बिहारचा युवक जिंकला आहे. माता-बहिणी-मुली जिंकल्या आहेत. बिहारचा गरीब जिंकला आहे, शेतकरी जिंकला आहे. हा बिहारच्या आकांक्षांचा विजय आहे, बिहारच्या गौरवाचा विजय आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
‘आम्ही लोकशाहीला समर्पित आहोत, आमच्या हेतूवर कोणी शंका घेऊ शकत नाही’
आम्ही लोकशाहीला समर्पित आहोत. देशाने आमच्यावर विश्वास दाखवला आहे. तो विश्वास पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आमच्या हेतूवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. आमच्या प्रयत्नांप्रती कधी कोणी निराश होत नाही, असेही मोदी पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times