पुणेः २०१४ ला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, खलनायक अशी उपाधी मिळालेला धनंजय मुंडे आज धनुभाऊ जो झाला तो केवळ शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे. नाहीतर धनंजयचा धनुभाऊ कधीच झाला नसता. पाच वर्षापूर्वी शरद पवारांनी माझ्यावर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली नसती तर कदाचित मी तुमच्या लक्षात आलो नसतो, दिसलोही नसतो, असे भावनिक उद्गार राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. कॅबिनेट मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या धनंजय मुंडे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे आभार मानले. आज मी जे काही आहे ते फक्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळेच आहे. पाच वर्षात विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळताना लोकांची कामे केली. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले. त्यामुळे मला ओळख मिळाली. नाही तर २०१४ साली मला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, धन्या, खलनायक असे बोलले जायचे. परंतु, जस जसा लोकांमध्ये मिसळत गेलो. लोकांची कामे केली. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर मी धन्याचा धनंजय झालो. त्यानंतर थेट…असे म्हणताच कार्यकर्त्यांनी शिट्या वाजवल्या. सात वर्षात खूप काही सहन केलं पण कधी दुःख व्यक्त केलं नाही. नाराजी व्यक्त केली नाही. समाजसेवेचा वसा जो हाती घेतला आहे तो स्वर्गीय मुंडे साहेबांमुळे, अण्णांमुळे…तो कधीच सोडला नाही,” असंही धनंजय मुंडे म्हणाले.

२०१४ ला गद्दार, घरफोड्या, पाठीत खंजीर खुपसणारा, खलनायक अशी उपाधी मिळालेला धनंजय मुंडे आज धनुभाऊ जो झाला तो केवळ शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे. नाहीतर धनंजयचा धनुभाऊ कधीच झाला नसता. पाच वर्षापूर्वी शरद पवारांनी माझ्यावर विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी दिली नसती तर कदाचित मी तुमच्या लक्षात आलो नसतो, दिसलोही नसतो, असे धनंजय मुंडे म्हणाले. शेवटी नियतीने सांगितलं आहे, कर्तृत्वाने आणि कष्टाने कमावल्यालचं कायम राहतं. अलगत मिळालेलं कधीच राहत नाही, असा टोला भगिनी पंकजा मुंडे यांना लगावला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here