वाचा:
महाराष्ट्र करोनाच्या विळख्यातून बाहेर येताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेची भीती असली तरी सध्याची करोनाची आकडेवारी मात्र दिलासा देणारी आहे. नवीन बाधित रुग्णांचा आकडा व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण यातील अंतर वाढत असल्याने व रिकव्हरी रेटही ९२ टक्क्यांच्या पुढे गेल्याने तो खूप मोठा दिलासा ठरला आहे. राज्यातील करोनामृत्यू ही मात्र चिंतेची बाब आहे. मंगळवारी ४६ मृत्यूंची नोंद झाली होती. गेल्या काही महिन्यांतील हा सर्वात कमी आकडा ठरला होता. मात्र आज दुसऱ्याच दिवशी त्यात मोठी वाढ झाली. राज्यात आज १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील २.६३ टक्के इतका आहे.
वाचा:
आतापर्यंत ९६ लाख करोना चाचण्या
आज ९ हजार १६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ९७ हजार २५५ करोना बाधितांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.२३ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ४ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख ३२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३१ हजार ८३३ (१८.०४ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४१ हजार ११८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ५५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८८ हजारांवर
करोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा (अॅक्टिव्ह रुग्ण ) आकडा वेगाने खाली येत आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या ८८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १६ हजार १०३ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर पालिका हद्दीत १५ हजार ८२५ व ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times