म. टा. वृत्तसेवा, पालघर: बनावट ग्राहक बनून आलेला चोरटा सराफाची नजर चुकवून लाखो रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे ट्रे घेऊन पसार झाला. जिल्ह्यातील तालुक्यातील मुख्य बाजारपेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

वाडा शहरात बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. वाडा एसटी स्थानकाजवळ असलेल्या पूजा ज्वेलर्समध्ये एक ग्राहक तोंडाला मास्क बांधून आला. त्याने दुकानातील सोन्याची चेन पसंत केली. त्यानंतर सराफाला सोन्याची अंगठी दाखवण्यास सांगितले. काउंटरमधील अंगठी काढण्यासाठी सराफ मागे वळला असता, त्याची नजर चुकवून ग्राहक तेथील सोन्याचे दागिने असलेले दोन ट्रे घेऊन पसार झाला. या घटनेची माहिती ज्वेलर्सचे मालक मोटाराम यांनी दिली.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असल्याची माहिती मोटाराम यांनी दिली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या चोरट्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here