मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बिहार निकालानंतर शिवसेनेनं तेजस्वी यादव यांचं गुणगाण सुरू केलं असताना आता भाजपच्या नेत्यांनी व काँग्रेसला टोले हाणले आहेत. भाजपचे आमदार यांनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचा संदर्भ देत शिवसेना व काँग्रेसवर टीका केली आहे. ‘शिवसेनेमुळं काँग्रेसला ऐकावं लागतंय,’ असा चिमटा नीतेश राणे यांनी काढलाय.

वाचा:

बिहार निवडणुकीच्या निकालाचं कवित्व थांबायला तयार नाही. बिहारमधील महाआघाडीच्या पराभवाला असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय. भाजपनं एमआयएमचा वापर करून घेतल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. एमआयएमनं सेक्युलर मतांमध्ये फूट पाडली. राष्ट्रीय जनता दल व आघाडीच्या जागा पाडून भाजपला मदत केल्याचा आरोप होत आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसनंही तसा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना ओवेसी यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीकडं बोट दाखवलं आहे. सेक्युलर मतांच्या बाता मारणाऱ्या काँग्रेसनं शिवसेनेशी आघाडी कशी केली? शिवसेना सेक्युलर पक्ष आहे का?’, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेचा हा व्हिडिओ ट्वीट करून नीतेश राणे यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.

वाचा:

‘महाराष्ट्रात शिवसेनेशी केलेल्या आघाडीमुळं प्रत्येक राज्यात काँग्रेसचा मतदार त्यांच्यापासून दुरावत आहे. काँग्रेसचं नुकसान झालं आहे आणि ही केवळ सुरुवात आहे,’ असा इशाराही नीतेश राणे यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here