अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यामध्ये फडणवीस यांनी बिहारमधील निवडणुकीतील कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीनं युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर गेल्यानं काँग्रेसनं बिहारमध्ये व्होट बँक कमी केलीये. तर, राष्ट्रवादीच्या आधी काही ठिकाणी जागा तरी येत होत्या आता तर ते ही झालं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावरूनच अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे.
शिवसेनेवर टिका करताना अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा केला आहे. तसंच, ‘शिवसेनेनं आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय, अशी टीका केली आहे. शिवाय, महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद’, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times