औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना राज्यातील भाजप नेत्यांकडून सरकारच्या स्थिरतेबद्दल नेहमी वक्तव्ये केली जातात. ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही. अंतर्विरोधानं सरकार पडेल,’ असं बोललं जातं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशा वक्तव्यांना पुन्हा एकदा जोर चढला आहे.
विरोधकांच्या या भाकितांचा जयंत पाटील यांनी आज जोरदार समाचार घेतला. ‘अशाच खोट्या आश्वासनांमुळे नाथाभाऊंना पक्ष सोडावा लागला,’ असं पाटील म्हणाले. ‘आमचं सरकार बळकट आहे, विरोधी पक्षातील उमेदवारांमध्ये भांडाभांडी आहे,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आज अर्ज भरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे दोघेही यावेळी उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी यांनी सरकारबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील हे राज्य सरकार पडेल, असं बोलत आहेत. दोन महिन्यांत पडेल, असंही ते म्हणाले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे सरकार ४ वर्षे पूर्ण करेल,’ असं पाटील म्हणाले. तर, चंद्रकांत पाटील यांनी आता स्वप्नच पाहावं,’ असा टोला थोरात यांनी हाणला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times