पंडित खासगी चालक म्हणून काम करत होते. पंडित यांचा निर्घृण करण्यात आला असून, तीक्ष्ण हत्याराने तब्बल २२ सेंटीमीटर गळा चिरला आहे. दरम्यान, हा खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रामदास पंडित हे केडगाव येथे चालक म्हणून कामाला आहेत. काल, बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून घरच्यांना दिली होती. यानंतर रामदास घरी आले नाही व त्यांचा फोन बंद येत होता. त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.
आज सकाळी रामदास पंडित यांचा मृतदेह कल्याण बायपासजवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खूणा आहेत. रामदास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. यावेळी त्यांचा गळा जवळपास २२ सेंटीमीटर चिरला असल्याचे समोर आले. दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times