किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे व वायकर यांच्या नावावरचे २१ सातबारा उतारे शोधून काढले आहेत. दोन्ही कुटुंबांनी जमिनींचे आर्थिक व्यवहार केले असून ते त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर केले आहेत. याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर जमिनींचे व्यवहार का करत आहेत? महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे समजावून सांगणार का?, असे सवाल किरीट सोमय्यांनी केले आहेत.
उद्धव ठाकरे यांचा जमीन- खरेदीचा व्यवसाय आहे का? त्यांचा रिअल इस्टेटीचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, रेवदंड्यातच जमिनी खरेदी करण्याचे कारण काय? ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचा आर्थिक संबंध काय? असे अनेक प्रश्न किरीट सोमय्यांनी ठाकरे कुटुंबावर केले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times