Avinash Pandey / मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांची काल, बुधवारी जामिनावर सुटका झाली असली तरी, त्यांच्या अडचणी अद्याप दूर झालेल्या नाहीत. गोस्वामी यांच्याविरोधात आता महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात गेल्या आठवड्यात गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईतील ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांनी २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली अटक करण्यासाठी रायगड आणि ४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी पोलीस पथकात सहभागी असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला गोस्वामी यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी गेल्याच आठवड्यात मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना अन्वय नाईक प्रकरणात जामीन मिळाला असला तरी, महिला पोलीस मारहाण प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्याय मिळणे गरजेचे: मलिक

अर्णब गोस्वामी प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी ‘नवभारत टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना सांगितले की, ‘कायद्यासमोर सगळेच समान आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि पीडितेला न्याय देणे यात अंतर असणे गरजेचे आहे.’ तर अर्णब यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. अर्णब यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यांना केवळ जामीन मिळाला आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयात हे प्रकरण गेले. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा आदर सरकार करत आहे, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here