जामिया आणि शाहीन बागमध्ये एका महिन्यापेक्षा अधिक काळापासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे माजी उपराज्यपाल सोमवारी जामिया येथे गेले होते. ते म्हणाले, ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात मुस्लिमांनाही सामील करून घ्यायला हवे, अन्यथा मग इतरांचीही नावे हटवायला हवीत.’
ते पुढे म्हणाले, ‘मला वाटतं की मध्ये सुधारणेची गरज आहे. एकतर त्यात मुस्लिमांचं नाव समाविष्ट व्हायला हवं किंवा इतरांची नावे हटवायला हवीत. जर मुस्लिम धर्माचा समावेश केला तर प्रकरण आपोआप मिटेल. जर पंतप्रधान या लोकांना बोलावतील आणि चर्चा करतील, तर यातून तोडगा निघेल.’
‘जेव्हा चर्चा होते, तेव्हा तोडगाही निघतो. चर्चाच केली नाही तर उत्तर कसं सापडेल. हे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अर्थव्यवस्थेवर संकट आहे, दुकानं बंद आहेत. नुकसानच नुकसान होत आहे,’ अशा शब्दात त्यांनी आपली कळकळ व्यक्त केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध दिल्लीत विविध ठिकाणी हिंसाचार झाला होता. जामियाजवळ हिंसक आंदोलन झाल्यानंतर पोलीस विद्यापीठात घुसले होते.
जामियातील या घटनेनंतर विरोधी आंदोलने सुरूच आहेत. विद्यापीठाने सत्र परीक्षाही रद्द केल्या आहेत आणि आता नव्या तारखांची घोषणा झाली आहे. दुसरीकडे शाहीन बागमध्ये महिला सातत्याने धरणे आंदोलन करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या आंदोलनाला पोहोचत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times