मुंबईः रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपकडून राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. भाजप नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरेंवरील या आरोपांवर शिवसेना नेत्या यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबासोबत जमिनीचे व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या कोर्लई किल्ला येथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांच्या या आरोपावर नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

‘गाणं म्हणणं, चेहरा बदलणं, अगोदरचा चेहरा नंतरचा चेहरा आणि वेगवेगळी विधानं करणे, असं त्यांना जमलं आहे. रश्मी ठाकरे यात कधी पडलेल्या नाहीत,’ असा टोला निलम गोऱ्हे यांनी भाजपला लगावला आहे. शिवाय, किरीट सोमय्यांवरही त्यांनी तोफ डागली आहे. किरीट सोमय्या यांनी सातत्याने जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. किरीट सोमय्या पाणचट आहेत हे वायकर बोलले होते, ते खरंच आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

१२ डिसेंबरपर्यंत पुरावे द्या

ठाकरे कुटुंबावर जे आरोप होत आहेत, त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एका महिन्यात म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत सोमय्या यांनी पुरावे द्यावे, पुरावे नाही दिले तर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी, असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here