मुंबई : ऑस्ट्रेलिच्या दौऱ्यात भारतीय संघाला नवीन जर्सी मिळणार आहे, अशी जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी नवीन जर्सी बनवलेली आहे. त्यामुळे आता भारतीय संघही या दौऱ्यात नवीन जर्सीसह उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चाहत्यांनी तर या नव्या जर्सीचा फोटोही व्हायरल केलेला आहे.

भारतीय संघ जेव्हा युएईमधून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाला होता, तेव्हा त्यांचा नवीन लुक पाहायला मिळाला होता. भारतीय संघातील खेळाडूंनी नवीन जर्सी आणि पीपीई किट्स परीधान केल्याचे पाहिले गेले होते. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघ नवीन जर्सीसह उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत कोणताही खुलासा बीसीसीआयने आतापर्यंत केलेला नाही. त्यामुळे या गोष्टीबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिल्यावरच चित्र स्पष्ट होऊ शकते.

कशी असेल ही जर्सी…ही जर्सी निळ्या रंगामध्ये असेल. पण हा निळा रंग जास्त गडद असेल, असे म्हटले जात आहे. त्याचबरोबर या जर्सीला खांद्यावर रंगीत पट्ट्या असतील. ज्या चाहत्यांनी १९९२ साली झालेला विश्वचषक पाहिले असेल तर त्यांना त्यावेळी भारतीय संघाने परीधान केलेली जर्सी आठवत असेल. तशीच ही जर्सी आपल्याला या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पाहायला मिळेल, असे समजत आहे.

भारतीय संघ एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत ही नवीन जर्सी घालणार असल्याचे समजते आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिल्यांदा तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकदिवसीय मालिका २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ४ ते ८ डिसेंबर या कालावधीमध्ये ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही मालिकेत भारतीय संघ ही नवीन जर्सी परीधान करून खेळणार का, याची उत्सुकता क्रिकेट विश्वातील चाहत्यांना आता लागलेली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here