यावर्षीच्या आयपीएलमध्ये आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये दोन साखळी सामने झाले. यामधील पहिल्या सामन्यात आरसीबीने ५९ धावांनी विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या संघाने पराभवाचा चांगलाच वचपा काढला आणि गुसरा सामना ६ विकेट्स राखून जिंकला होता. या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंगमध्ये बाचाबाची झाली होती, असे अश्विनचे म्हणणे आहे.
ही गोष्ट स्ट्रॅटेजिक टाइम सुरु असताना झाली होती. त्यावेळी कोहली हा मैदानांवरील पंचांबरोबर काही गोष्टींबाबत संवाद साधत होता. ही गोष्ट दिल्ली कॅपिटल्सबाबतची होती. त्याचवेळी कोहली आणि पॉन्टिंग यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. अश्विनने एका यूट्यूबच्या कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. कोहली आणि पॉन्टिंग यांच्यामध्ये बाचाबाची माझ्यामुळेच झाली होती, असे अश्विनचे म्हणणे आहे.
याबाबत अश्विन म्हणाला की, ” आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मी गोलंदाजी करत होतो. गोलंदाजी करत असताना मी जेव्हा रनअप घेत होतो तेव्हा माझ्या पायातील स्नायू दुखावले गेले होते. त्यानंतर डॉक्टरांनीदेखील माझी दुखापत पाहिली आणि पायामधील स्नायू दुखावले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पण ते षटक मी पूर्ण केले आणि त्यानंतर कोहली आणि पॉन्टिंग यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. मी मैदान सोडण्याच्या निर्णयावर कोहली नाराज झाला होता. त्यामुळे त्याने कदाचित याबाबत आक्षेप घेतला असावा. त्यामुळेच ही गोष्ट पाहायला मिळाली.”
आयपीएल संपल्यावर अश्विनने युट्युबवर एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाक अश्विनने याबाबतचा खुलासा केल्याचे पाहायला मिळाले आहे. पण पॉन्टिंगने हा विषय जास्त ताणून धरला नाही, असेदेखील अश्विनने यावेळी सांगितले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times