मुंबई- ग्रुप डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रभू देवाचं नाव आज जगातील टॉप कोरिओग्राफर्समध्ये घेतलं जातं. याशिवाय तो उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शकही आहे. लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याची सध्या इण्टरनेटवर चर्चा आहे. काही वर्षांपूर्वी प्रभू देवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला होता. दोघांमध्ये अनेक वर्ष वाद सुरू होते. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आता प्रभू देवा आपल्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशा चर्चा असल्या तरी प्रभू देवा किंवा त्याच्या टीमकडून या अहवालावर अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

प्रभू देवा सध्या सलमान खानच्या ‘राधे: यूवर मोस्ट वॉण्टेड भाई’ सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय अनेक तमिळ सिनेमांमध्ये तो मुख्य भूमिकेतही दिसणार आहे. अभिनेता म्हणून ‘पोन मनिकवेल’ हा प्रभू देवाचा ५० वा सिनेमा असणार आहे. या सिनेमात तो पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here