नवी दिल्लीः कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ( ) यांनी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेच्या ( ) मुद्यावर केंद्र सरकारला घेरण्यास सुरवात केली आहे. राहुल गांधींनी गुरुवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी उचललेल्या पावलांमुळे देश प्रथमच मंदीत ढकलला गेला आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तर राहुल गांधींच्या आरोपांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी उत्तर देत जोरदार हल्ला चढवला आहे.

‘पक्षावर लक्ष केंद्रीत करा, काँग्रेसमधून होतोय विरोध’

राहुल गांधींनी आपल्या पक्षावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. कॉंग्रेसमध्ये त्यांच्याविरूद्ध वातावरण तयार होत आहे. त्यांची मतपेढी संकुचित का होत आहे आणि लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दोनदा पराभव का मिळाला? याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

‘मोदींमुळे पहिल्यांदा आली मंदी’, राहुल गांधींचा दावा

‘इतिहासात प्रथमच भारत मंदीच्या दरीत ढकलला गेला आहे. मोदींनी उचलेल्या चुकीच्या पावलामुळे भारत आता कमकुवत झाला आहे, असं राहुल गांधींनी ट्विट केलंय. वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या दुसर्‍या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) जीडीपीमध्ये ८.६ टक्के घट होईल, असा अंदाज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आहे. राहुल गांधींनी आरबीआयच्या याच अंदाजाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

‘देश भयंकर मंदीच्या चक्रात’

देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकली आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही बातमी दाबण्यासाठी पॅकेज जाहीर केलं आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नसल्याचा आरोपही पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. सरकारी आकडेवारीनुसार इतिहासात प्रथमच अर्थव्यवस्था मंदीत गेली आहे. दुसर्‍या तिमाहीत जीडीपी ८.६ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले. सलग दोन तिमाहीत नकारात्मक विकास दर म्हणजे भयंकर मंदी आहे’, असं चिदंबरम म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here