नवी दिल्ली: देशात ” सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर गृह मंत्रालयाने दिले आहे. ‘टुकडे-टुकडे गँग’ देशातील अशांततेला जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या अनुशंगानेच गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.

‘टुकडे-टुकडे गँग’ कधी व कशी अस्तित्वात आली? या गँगचे सदस्य कोण-कोण आहेत?, या गँगवर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली बंदी का घातली जात नाही?, असे प्रश्न साकेत गोखले यांनी आपल्या अर्जात विचारले होते. २६ डिसेंबर २०१९ रोजी गोखले यांनी हा अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी मी विचारलेले प्रश्न संवेदनशील आहेत व त्यावर २६ जानेवारीच्या आत उत्तर मिळाले नाही तर मुख्य माहिती आयुक्तांपुढे मी जाणार आहे, असेही गोखले यांनी नमूद केले होते. या अर्जावर अखेर आज गृह मंत्रालयाने उत्तर दिले असून अशी कोणतीही गँग अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गृह मंत्रालयाच्या उत्तरानंतर साकेत गोखले आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाबाबत ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. जाहीर सभेत ‘टुकडे-टुकडे गँग’ हा शब्दप्रयोग का केला, हे अमित शहा यांनी सांगायला हवे. अन्यथा जनतेशी खोटे बोलले व जनतेची दिशाभूल केली म्हणून त्यांनी जाहीरपणे माफी मागायला हवी, अशी मागणी गोखले यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here