वी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणावामुळे ( ) जगातील शक्तीशाली देशही चिंतेत आहेत. दोन्ही देशांचे सैनिक आधुनिक शस्त्रास्त्रांसह सीमेवर तैनात आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील वाढत्या तणावामुळे रशिया ( ) देखील चिंतेत आहे. ‘भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यास संपूर्ण युरेशिया प्रदेशात अस्थिरता वाढेल’, असं म्हणत रशियाने आपलं शक्तिशाली शस्त्रं एस -400 लवकरात लवकर भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.

‘आदरपूर्ण संवाद हेच महत्त्वाचे शस्त्र’

भारतातील रशियाच्या दुतावासाचे उपप्रमुख रोमन बाबुश्कीन ( ) यांनी ऑनलाइन मीडियाला ब्रीफिंग केलं. आशियातील दोन शक्तीशाली सैन्यामधील तणावामुळे रशिया चिंतित आहे. दोन्ही देशांमधील ‘सकारात्मक संवाद’ फार महत्त्वाचा आहे. भारत आणि चीन शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्सचे सदस्य आहेत. यामुळे बहुपक्षीय क्षेत्रावरील सहकार्याचा विचार केल्यास आदरपूर्वक संवाद हेच महत्त्वाचे शस्त्र असते, असं बाबुश्कीन म्हणाले.

‘भारत-चीन तणावाचा जागतिक परिणाम’

‘जागतिक पातळीवरील उलथापालथ आणि अनिश्चिततेच्या वातावरणात भारत आणि चीनमधील तणाव वाढल्यास यूरेशिया प्रदेशाच्या स्थिरतेवर त्याचा परिणाम होईल. या तणावाचा दुरुपयोग अन्य सक्रिय शक्तींकडून आपल्या भौगोलिक-राजकीय स्वार्थासाठी केला जातोय. आमच्या दोन्ही आशियाई मित्र देशांनी अधिक सकारात्मक संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करणं महत्त्वाचे आहे’, असं ते म्हणाले.

‘रशियाचा एक विशेष दर्जा आहे, कारण त्याचे भारत आणि चीन या दोघांशी विशेष रणनीतिक संबंध आहेत आणि ते स्वतंत्र स्वरुपाचे आहेत. स्वाभाविकच भारत आणि चीनमधील तणावाबद्दल रशिया चिंतेत आहे. आज ना उद्या शांततेने यावर तोडगा काढला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. दोन्ही देश शक्तीशाली आणि जबाबदार शेजारी आहेत. त्यांच्यात आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात भरपूर क्षमता आणि संस्कृतीक पातळीवर समजूतदारपणा आहे, असं त्यांनी सांगितलं.

‘भारताला लवकरच एस -400 क्षेपणास्त्र यंत्रणा मिळणार’

एस -400 क्षेपणास्त्र यंत्रणा लवकरात लवकर भारतात पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचं रशियाने सांगितलं. एस -400 हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला मिळतील. दोन्ही देश परस्पर लॉजिस्टिक सहकार्य करारावर काम करत आहेत आणि अब्जावधी डॉलर्सचा कराराला अंतिम स्वरुप दिले जात आहे. याअंतर्गत अंतर्गत भारत-रशियन संयुक्त या उपक्रमात 200 कामोव्हचे उत्पादन होईल, अशी माहिती रोमन बाबुश्कीन यांनी दिली.

ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने रशियाबरोबर एस -400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या ५ युनिट्स खरेदी करण्यासाठी रशियाबरोबर ५ अब्ज डॉलर्सचा करार केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here