कोलकाताः बिहार निवडणुकीच्या निकालानंतर ( ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( ) यांनी महाआघाडीचे नेते तेजस्वी यादव ( ) यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं आहे. एनडीएला जोरदार टक्कर दिल्याने टीएमसीच्या प्रमुख ममतादीदींनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं.

निवडणुकीत एनडीएला जोरदार टक्कर दिल्याबद्दल आणि जातीयवादी शक्तींविरूद्ध लढा देण्याचं वचन दिल्याचे तेजस्वी यादव यांचं ममता बॅनर्जींनी अभिनंदन केलं. ममता यांनी तेजस्वी यांना फोन करून त्यांच्याशी चर्चाही केली. तेजस्वी यादव हे ममता बॅनर्जींच्या बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दिसून आलेत.

बिहार निवडणुकीत एनडीएसमोर तेजस्वी यादव यांनी मोठं आव्हान निर्माण केलं होतं. याबद्दल ममतांनी त्यांचं अभिनंदन केलं. ममता बॅनर्जींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. बिहारमधील कमी अनुभव असलेल्या तेजस्वी यांच्यासमोर अनेक दिग्गज नेत्यांचे आव्हान होते. तेजस्वी यांनी मोठ्या धडाडीने निवडणूक लढवली. यामुळे लाखो तरुणांसाठी हा प्रेरणास्रोत ठरणार आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत. भाजपला ७४ जागा आणि जेडीयूला ४३ जागा मिळाल्या. त्याचवेळी आरजेडीला ७५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर आरजेडीचा सहयोगी कॉंग्रेस पक्षाला १९ जागा आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीला एकूण ११० जागा मिळाल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here