मुंबई: शिवसेनेच्या प्रत्येक संकटात ढाल बनून उभे राहणारे नेते व प्रवक्ते यांनी आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध आखाड्यात उतरले आहेत. सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या आरोपांना ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत राऊत यांनी पहिला पलटवार केला आहे. ( Leader Attacks )

आणि ठाकरे कुटुंबात जमीन व्यवहार झालेत, असा आरोप करून किरीट सोमय्या यांनी सनसनाटी निर्माण केली आहे. अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक झालेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अंतरिम जामिनावर सुटका झाल्यानंतर सोमय्या यांनी लगेचच ठाकरे कुटुंबावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यासाठी सोमय्या यांच्या लागोपाठ पत्रकार परिषदा होत आहेत. त्यावर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ असे म्हणत खुले आव्हानच सोमय्या यांना दिले आहे.

वाचा:

राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सोमय्या यांचा समाचार घेतला आहे. ‘अन्वय नाईक यांच्यासोबत २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी औलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र’, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. जे आरोप केलेत त्याबद्दल पुरावे दाखवले नाहीत तर पुढच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे सांगण्याचाच प्रयत्न राऊत यांनी या माध्यमातून केला आहे.

वाचा:

सोमय्या यांचा नेमका आरोप काय?

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळ कोर्लई किल्ला येथे आणि मनीषा वायकर यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबाकडून जमीन खरेदी केली, असा आरोप करत यांनी हा जमीन खरेदी व्यवहार का लपून ठेवला? असे अजून किती व्यवहार झाले आहेत?, असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारले आहेत. २१ मार्च २०१४ रोजी ठाकरे परिवाराकडून नाईक कुटुंबीयांना २ कोटी २० लाख रुपये देण्यात आले. या जमीन व्यवहारातील सातबारा संयुक्त आहे. ठाकरे आणि वायकर हे दोघांनी मिळून हा व्यवहार का केला?, असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी सोमय्या यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात २१ जमीन व्यवहार झाल्याचा दावा केला. उद्धव ठाकरे यांचा जमिनी घ्यायचा व विकायचा व्यवसाय आहे का?, असाही त्यांचा प्रश्न होता. त्यामुळे चांगलीच आक्रमक झाली असून आधी शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे व आता संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर पलटवार केला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here