जयपूरः राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ( sachin pilot ) हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सचिन पायलट यांनी ट्विट करून याविषयी माहिती दिली. ‘आपल्या करोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे’, असं त्यांनी सांगितलं. यानंतर सचिन पायलट यांना लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सचिन पायलट यांनी लवकर बरं व्हावं, असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले. याशिवाय सचिन पायलट यांचे मित्र आणि भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे ( ) यांनीही त्यांच्या प्रकृतीस लवकर आराम मिळावा, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन पायलट हे लवकर बरे व्हावेत. यासाठी त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असं अशोक गहलोत यांनी ट्विट केलं आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे अस्वस्थ असल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी आपण देवाला प्रार्थना करतो, असं सचिन पायलट यांचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

राजस्थान सरकारच्या अनेक मंत्र्यांना अलिकडेच करोनाची संसर्ग झाला होता. प्रतापसिंह खाचरियावास, कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार बद्री राम जाखड यांच्यासह भाजपचे आमदार कालीचरण सराफही करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते.

राजस्थानामध्ये करोनाची २ लाखाहून अधिक रुग्ण

राजस्थानमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची एकूण संख्या २ लाखाहून अधिक आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २,१७,१५१ इतकी झाली आहे. यापैकी १६,९९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात करोनाने आतापर्यंत २,०१९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये १,९८,१३९ जण बरे झाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here