मुंबई: विरोधी पक्षनेते यांच्या पत्नी यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्याने आणि भाजमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना प्रवक्त्या डॉ. यांनी एका निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यात एका शब्दालाही किती महत्त्व असते हे सांगण्यासाठी अमृता या नावाचा फोड करत टीकेचा बाण डागण्यात आला आहे. ( Spokesperson Criticizes Amrita Fadnavis )

वाचा:

‘का हय ये – शवसेना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार में! काय चाल्लय तरी काय – शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये! महाराष्ट्र कुठेही नेलेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद’, अशा प्रकारचे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.

वाचा:

‘शवसेना’ या शब्दावरून ‘एका शब्दाचे महत्त्व असते’ असे नमूद करतच शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी अमृता यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमृता या शब्दातील ‘अ’ चे भान महत्त्वाचे आहे. अमृताताई आपण या दीपावलीच्या दिवसांत अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही’, असा इशाराच गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मन:स्वास्थ्य चांगले राहते आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते हे देखील आज विसरू नका, असा टोलाही गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. आपल्या नावात ‘अ’ चं महत्त्व आहे आणि ते निघाले तर ‘मृता’ उरेल, असे नमूद करताना तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपा, असा खरमरीत सल्लाही गोऱ्हे यांनी अमृता यांना दिला आहे. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’ योग्य बरे का, असे खोचकपणे सुनावताना ही आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, असेही नीलम गोऱ्हे यांनी शेवटी नमूद केले आहे.

वाचा:

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. रश्मी ठाकरे व अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांत जमीन व्यवहार झालेत, असा सोमय्या यांचा दावा आहे. त्यावरून अमृता फडणवीस यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्याला नीलम गोऱ्हे यांनी आधीच प्रत्युत्तर दिले आहे. ‘गाणे म्हणणे, चेहरा बदलणे आणि वेगवेगळी विधाने करणे, हे तुम्हालाच जमते. रश्मी ठाकरे यात कधी पडल्या नाहीत, असा टोला गोऱ्हे यांनी अमृता यांना लगावला होता. त्याचवेळी ठाकरे कुटुंबावर केलेल्या आरोपांबद्दल एका महिन्यात पुरावे द्या, अन्यथा जाहीरपणे माफी मागा, असे आव्हानही गोऱ्हे यांनी दिलेले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here