म. टा. प्रतिनिधी, पुणेः बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक ‘कोव्हीशिल्ड’ लशीच्या देशभरातील ( ) चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सीरम इन्सिट्यूटने ( serum institute ) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) सहकार्याने स्वयंसेवकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सीरमच्या या लशीच्या देशभरात १५ ठिकाणी चाचण्या सुरु असून त्यासाठी सोळाशे स्वयंसेवकांचा समावेश आहे. महिनाअखेरपर्यंत ही लस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

‘कोव्हीशिल्ड’बरोबर सीरम इन्स्टिट्यूट आणि आयसीएमआर यांच्या भागीदारी संशोधनातून ‘कोव्होव्हॅक्स’ (नोव्हाव्हॅक्स) ही लशीच्या चाचण्यांवर काम केले जात आहे. ‘कोव्हीशिल्ड’च्या चाचण्यांसाठी येणारा खर्च हा सीरमने तर शुल्कासंदर्भातील खर्च हा आयसीएमआरने उचलला आहे. या दोघांच्या भागीदारीतून ‘कोव्हीशिल्ड’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचण्यांसाठी देशात १५ ठिकाणची केंद्र निश्चित केली आहेत. या चाचण्यांसाठी लागणाऱ्या सोळाशे स्वयंसेवकांची नोंदणीची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत सीरम आणि ‘आयसीएमआर’ने पूर्ण केली आहे. मूळच्या अॅस्ट्राझेनका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लशीचे उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात येत आहे. इंग्लडमध्ये तयार करण्यात आलेल्या या लशीची सद्या जगभरात इंग्लंड, ब्राझील दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यातील काही निष्कर्षांमुळे करोनावर मात करण्यासाठी साथीच्या काळात ‘कोव्हीशिल्ड’ ही लस उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास सीरम तसेच आयसीएमआरने व्यक्त केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here