म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने व रिपब्लिक भारत या वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना अंतरिम जामीन नाकारल्यानंतर या वाहिन्यांवर उच्च न्यायालयाच्याच विरोधात आक्षेपार्ह पद्धतीने विधाने करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला राजकीय रंग देऊन न्यायालयाची प्रतिमा जनमानसात डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असा आरोप करत उच्च न्यायालयातील वकील अॅड. सैफ आलम यांनी ”ला कायदेशीर नोटीस दिली आहे. ‘वाहिन्यांवरील त्या आक्षेपार्ह विधानांविषयी वाहिन्यांवरच जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिन्यांच्या विरोधात आम्हाला न्यायालय अवमानाची याचिका दाखल करावी लागेल’, असा इशाराही आलम यांनी नोटिशीत दिला आहे.

‘उच्च न्यायालयातील सुनावणी आणि आदेशासंदर्भात आपल्या वाहिनीवरील रिदम नावाच्या निवेदिकेने अर्णव गोस्वामींच्या विरोधात हे सर्व कारस्थान असल्याचे विधान केले. उच्च न्यायालयाने प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार अंतरिम जामीन नाकारणारा निर्णय दिला. मात्र, गोस्वामींना गजाआड ठेवण्याच्या कटात उच्च न्यायालयही सहभागी असल्याच्या आशयाची विधाने कार्यक्रमात करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याऐवजी अनादर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. वाहिन्यांनी आदेशाविषयी चुकीचे व नकारात्मक चित्र दाखवून अपप्रचार केल्याने सोशल मीडियावरही लोकांनी उच्च न्यायालयाविषयी आक्षेपार्ह विधाने केली. न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्यावरही लोकांनी चुकीचे व आक्षेपार्ह आरोप केले. तुम्ही जनमानसात उच्च न्यायालयाची प्रतिमा डागाळण्याचे काम केले असून यामुळे वकील वर्गाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या साऱ्या प्रकाराबद्दल आपल्या वाहिन्यांवरच जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिन्यांविरोधात न्यायालय अवमानाची याचिका दाखल करावी लागेल’, असे आलम यांनी नोटिशीत म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here