नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी काँग्रेस नेते यांचं वर्णन ‘चिंताग्रस्त, अस्थापित गुणवत्तेचा नेता’ असं केलं आहे. राहुल गांधी हे एका अशा विद्यार्थ्यासारखे आहेत, जे शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी उत्सुक असतात, पण योग्यता आणि महत्त्वकांक्षेचा अभाव आहे, असंही बराक ओबामा यांनी म्हटलं आहे.

‘अ प्रॉमिस्ड लँड’ या बराक ओबामांच्या आठवणींचा द न्यूयॉर्क टाइम्सने आढावा घेतला आहे, ज्यात विविध मुद्द्यांवर ओबामा यांनी जगभरातील राजकीय नेत्यांविषयी भाष्य केलं आहे.

राहुल गांधींचं वर्णन करताना ओबामा म्हणतात, ‘त्यांच्यामध्ये चिंताग्रस्त असणं आणि अस्थापितपणा हे गुण आहेत. राहुल गांधी एक असे विद्यार्थी होते, जे शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी तर उत्सुक आहेत, पण विषयात गुणवत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली योग्यता आणि महत्त्वकांक्षा त्यांच्याकडे नाही,’ असं न्यूयॉर्क टाइम्समध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही ओबामांनी उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘आपल्याला चार्ली क्रिस्ट आणि रॅम इमॅन्युअल यांसारख्या पुरुषांचा हँडसमनेस सांगितला जातो, पण महिलांचं सौंदर्य नाही. यात एक किंवा दोन उदाहरणांचा अपवाद आहे, असं की सोनिया गांधी.’

अमेरिकेचे माजी संरक्षण संचिव बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह या दोन नेत्यांचं शांत आणि गुणवत्तापूर्ण असं वर्णन करण्यात आलं आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वर्णन कठीण आणि स्मार्ट बॉस म्हणून करण्यात आलंय. शारीरिकदृष्ट्या ते अतुलनीय आहेत, असंही ओबामा पुतिन यांच्याबद्दल म्हणतात.

७६८ पानांच्या या आठवणी १७ नोव्हेंबरला जारी होण्याची शक्यता आहे. यात ओबामांनी आपलं बालपण आणि २००८ ची ऐतिहासिक निवडणूक यासह आपल्या कार्यकाळातील आठवणी सांगितल्या आहेत. ओबामा हे आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी २०१० आणि २०१५ मध्ये भारत दौरा केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here