बीजिंग: भारतातून चीनमध्ये आयात केलेल्या फ्रोझन माशांच्या पाकिटांवर करोनाचा विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. चीनने फ्रोझन मासे आयात करणाऱ्या बसू इंटरनॅशनल या कंपनीवर एक आठवड्याची बंदी घातली असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीनमध्ये करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी विविध पातळीवर दक्षता घेतली जात आहे. भारत आणि चीनमध्ये व्यापार सुरू आहे. भारतातून चीनमध्ये फ्रोझन मासे पाठवण्यात येतात. भारतासह इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंची तपासणी केली जाते. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. भारतातून आलेल्या फ्रोझन माशांच्या तीन पाकिटांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यावर करोनाचे विषाणू आढळले. त्यानंतर या माशांची आयात करणाऱ्या बसू इंटरनॅशनल या कंपनीवर एक आठवड्यांची बंदी घातली आहे. एका आठवड्यानंतर कंपनी पुन्हा एकदा आपला व्यापार सुरू करू शकते असेही चीनच्या कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे.

वाचा:

वाचा:

या आधीदेखील फ्रोझन फूड पाकिटांवर करोनाचे विषाणू आढळले होते. मागील महिन्यात क्विंगदाओ बंदरात आलेल्या फ्रोझन माशांच्या पाकिटांवर करोनाचे विषाणू आढळले होते. फ्रोझन फूड पाकिटांवर करोनाचा विषाणू आढळण्याची ही पहिली घटना असल्याचे ‘चायनीझ सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन’ने सांगितले होते. चीनमध्ये रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाली असली तरी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

वाचा:

वाचा:
दरम्यान, चीनमधील एका विमानतळ कर्मचाऱ्याला करोनाची बाधा असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने जवळपास आठ हजारजणांची
चाचणी केली आहे. या कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघाईमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जवळपास १८६ जणांना क्वारंटाइन करण्यात आले. तर, आठ हजारांहून अधिक जणांची करोना चाचणी करण्यात आली. या विमानतळ कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणाही करोनाबाधित आढळले नसल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here