वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्याशिवाय नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर काम करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे केले नसल्याचे बोलले जात आहे.

बिल क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. तत्कालीन उपाध्यक्ष अल गोर रिपब्लिक पक्षाचे जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. गोर आठ वर्षांपासून अध्यक्षांना देशाच्या गुप्तहेर खात्याकडून प्राप्त होणाऱ्या दैनंदिन वृत्तांचे वाचन करीत होते. मात्र, क्लिंटन यांनी ती माहिती बुश यांना देण्यासही सांगितले होते. आगामी निवडणुकीत बुश जिंकल्यास त्यांना देशातील महत्त्वाच्या गुप्त बाबींची माहिती असावी, असा त्यांचा हेतू होता. त्या वेळी बुश जिंकले आणि त्यांना याचा फायदा झाला होता.

वाचा:

वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र बायडन यांना गुप्त माहिती देण्यास सहकार्य केलेले नाही. ट्रम्प याबाबत लवकरच बायडन यांना माहिती देतील, जेणेकरून कारभाराच्या पहिल्या दिवसापासूनच नवनिर्वाचित अध्यक्षांना देशासमोरील आव्हानांची व प्रश्नांची सर्व माहिती असेल, अशी आशा राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

वाचा:

‘चीफ ऑफ स्टाफ’पदी रॉन क्लेन

जो बायडन यांनी ‘व्हाइट हाउस चीफ ऑफ स्टाफ’ या पदासाठी रॉन क्लेन यांची निवड केली आहे. क्केन यांनी यापूर्वी दोन उपाध्यक्षांसाठी ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून काम केले आहे. बायडन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर क्लेन त्यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतील आणि अध्यक्षांच्या कार्यालयाची सुत्रेदेखील सांभाळतील. बायडन म्हणाले, ‘क्लेन माझ्यासोबत खूप वर्षांपासून काम करीत आहेत. २००९ मध्ये जागतिक मंदीच्या फटक्यातून अमेरिकेला सावरण्यात त्यांनी मोलाची साथ दिली होती. २०१४मध्ये इबोलाच्या संकटातून देशाला सावरण्यातही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राजकीय क्षेत्रातील विविध लोकांसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि त्यांचा मला निश्चित त्याचा लाभ होईल.’

वाचा:

अलास्कात ट्रम्प विजयी

अमेरिकी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प अलास्कामध्ये विजयी झाले असून, त्यांचा एकूण २१७ जागांवर विजय झाला आहे. रिपब्लिकन पक्षाने अलास्कातील सिनेटच्या जागेवरही आपली पकड मजबूत ठेवली आणि विजय खेचून आणला. यामुळे १०० सदस्यांच्या अमेरिकी सिनेटमध्ये आता ५० जागांवर रिपब्लिकन पक्षाला विजय मिळवता आला आहे. ट्रम्प यांना अलास्कात ५६.९ टक्के मते मिळाली, तर बायडन यांना ३९.१ मते मिळाली.

जॉर्जियात फेरमतमोजणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियातील मतदानावर आक्षेप घेऊन मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केल्याने आता तेथे फेरमोजणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जॉर्जियामध्ये जो बायडन १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, पराभव स्वीकारण्यास ट्रम्प तयार नाहीत. दरम्यान, जॉर्जियाचे गृहमंत्री ब्रॅड रॅफन्स्पर्जर यांनी सांगितले, की दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमधील फरक कमी होत असल्याने फेरमोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here