नवी दिल्ली:
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून भारतीय जनता पक्ष आणि त्याचा सहयोगी पक्ष शिरोमणी अकाली दलमध्ये जुंपली आहे. दिल्ली एसजीपीसीचे अध्यक्ष आणि अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोमवारी जाहीर केले की पक्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढणार नाही. ते म्हणाले, ‘भाजपसोबतच्या बैठकीत आमच्या सीएएवरील भूमिकेसंदर्भात पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले, त्याला आम्ही नकार दिला.’

दिल्लीत पक्षाची तीच भूमिका आहे, जी सुखबीर सिंह बादल यांची आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात सर्व धर्मांचा समावेश करायला हवा. शिरोमणी अकाली दलाच्या भाजपसोबत तीन बैठका झाल्या. या बैठका निवडणुकांसंदर्भात होत्या. या बैठकांमध्ये अकाली दलाला भाजपने आपली सीएएसंबंधीची भूमिका बदलण्यास सांगितले होते. त्याला नकार देत अकाली दलाने पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला आहे, असं सिरसा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुस्लिमांना पासून विलग करू नका: सिरसा
विधानसभेच्या राजौरी गार्डन जागेवर भाजपच्या तिकिटावर सिरसा आमदार झाले आहेत. ते म्हणाले, ‘मुस्लिमाना CAA पासून वेगळं केलं जाऊ शकत नाही,असं आमचं मत आहे.’ शिरोमणी अकाली दलाचं मत असं आहे की NRC लागू करायला नको. आम्ही CAA चं स्वागत केलं, पण कोणत्याही एका धर्माला त्यापासून बाहेर ठेवलं जाणं आम्हाला पटत नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here