म. टा. प्रतिनिधी, : नातेवाइक तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणी आणि तरुण एकमेकांचे नातलग आहेत. आरोपी तरुणीचा आतेभाऊ आहे. नात्याचा गैरफायदा घेऊन आरोपी तरुणाने तक्रारदार तरुणीशी ऑक्टोबर २०१९ पासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिला वारंवार व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज करून त्रास दिला. ‘मी सांगीन तसेच वागायचे. मला दररोज अपडेट द्यायचे. रिप्लाय द्यायचा आणि माझा नंबर ब्लॉक किंवा डिलिट करायचा नाही,’ अशी धमकी त्याने तरुणीला दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. आपण सांगेल तसेच वागायचे, असे सांगत आरोपी याने संबधित तरुणीचा छळ केला. पोलिस उपनिरीक्षक मनीषा कथले अधिक तपास करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times