नीतेश यांनी या संदर्भात एका मागोमाग एक ट्वीट केले आहेत. ‘फॉरेन्सिक लॅबमधील एका व्यक्तीनं दिशाच्या फॉरेन्सिक रिपोर्टचा तपशील मला दाखवला होता. त्यात दिशानं आत्महत्या केल्याचं कुठंही नमूद करण्यात आलेलं नाही. असं असताना पोलीस या प्रकरणाची फाईल बंद करण्याची घाई का करत आहेत? दिशाच्या प्रकरणात पुरावेच नव्हते तर दोन वेळा तपास अधिकारी का बदलावा लागला? रोहन राय हा अजूनही फरार का आहे. दिशाच्या आत्महत्येच्या रात्रीपासून तिच्या बिल्डिंगचा सुरक्षारक्षक गायब का आहे? दिशाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप खुला का करण्यात आलेला नाही? ज्या रात्री दिशानं आत्महत्या केली, त्या रात्रीचे मोबाइल टॉवर लोकेशन तपासण्यात आले आहेत का? तपासाशिवाय पोलीस हे प्रकरण घाईघाईनं का बंद करत आहेत?,’ असे प्रश्न नीतेश यांनी विचारले आहेत.
वाचा:
‘दिशाच्या आत्महत्या प्रकरणात नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे. आम्ही सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. पुरावे बाहेर आल्यानंतर पोलिसांची फजिती होणार नाही अशी अपेक्षा आहे,’ असंही नीतेश राणे यांनी म्हटलं आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी दिशा सालियन हिनं घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर उठलेल्या वादळानंतर दिशाच्या आत्महत्येची नव्यानं चर्चा सुरू झाली होती. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला होता.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times