पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. कर्मचारी येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यात व्यग्र होते. याच संधीचा फायदा घेऊन चालकाने एटीएम व्हॅन पळवली. या व्हॅनमध्ये सुमारे सव्वाचार कोटी रुपये होते. एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्राथमिक चौकशी केली असता, या एटीएम व्हॅनमध्ये सव्वाचार कोटींची रोकड असल्याची माहिती मिळाली.
अर्नाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले की, एटीएम व्हॅनमध्ये सव्वाचार कोटी रुपये होते. चालकाने रोकड असलेली व्हॅन पळवली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि विकेंडमुळे एटीएममध्ये पुरेसे पैसे भरण्यात येत आहेत, असे एटीएममध्ये रोकड जमा करणाऱ्या कंपनीकडून सांगण्यात आले. चालकाची ओळख उघड केलेली नाही. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times