वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात यांना अटक केल्यापासून भाजप ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या यांनी नाईक व ठाकरे कुटुंबामध्ये २१ जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केला आहे. ‘या दोन कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली होती. सोमय्यांच्या या आरोपांना राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
वाचा:
‘कोणी काय व्यवहार करावा आणि कशासाठी करावा? हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते सांगू शकत नाहीत. मुळात हे एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण आहे. त्यांची पत्नी व कन्या न्यायासाठी आक्रोश करताहेत. त्याबद्दल शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते बोलत नाही. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना हे कुठलेही फालतू मुद्दे घेऊन पुढं येताहेत. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे,’ असं राऊत म्हणाले.
‘आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. २१ व्यवहार केल्याचा आरोप करताहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार,’ असंही राऊत यांनी ठणकावलं.
वाचा:
‘ह्यांना पाच नव्हे २५ वर्षे घरी बसवणार’
‘नैराश्य आणि वैफल्यातून हे सगळे उद्योग सुरू आहेत. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुरुंगात जाता. आकांडतांडव करता. कोण आहे तो तुमचा? एका मराठी महिलेचा पती, सासू मेलीय. ती कोणी लागत नाही का तुमची?,’ असा सवाल करतानाच, ‘हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे व्यापारी आहेत, म्हणूनच आम्ही त्यांना घरी बसवलंय. पाच नव्हे आणखी २५ वर्षे तुम्हाला घरी बसवू,’ असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times