मुंबई:
अॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील विषयावर अभिनेत्री दीपिका पादुकोणने बनवलेला ” सिनेमा एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाल करतोय, पण या सिनेमापुढील अडथळे मात्र संपताना दिसत नाहीत. आता सोशल मीडियावर दीपिकाचा एक टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती तिच्या मेकअप आर्टिस्टला छपाकमधील मालतीचा लुक तयार करायला सांगते. या व्हिडिओला अभिनेत्री कंगना रणौतने असंवेदनशील म्हटले आहे आणि दीपिकाने यासाठी माफी मागायला हवी, असं म्हटलं आहे.

एका मुलाखतीत कंगना रणौतने म्हटलं, ‘माझी बहीण अॅसिड हल्ल्याची पीडिता आहे. तिला दीपिकाच्या या व्हिडिओने खूप त्रास झाला आहे. हा व्हिडिओ खूप असंवेदनशील होता.’ अर्थात कंगनाने असंही म्हटलं की ‘अनेकदा तुमची मार्केटिंग टीम प्रमोशन्ससाठी अशा कल्पना घेऊन येते आणि तुमची इच्छा नसूनही तुम्ही असंवेदनशील वाटेल असं काही करून जाता. अॅसिड हल्ल्यानंतर विद्रुप झालेला चेहरा हा काही कुठला मेकअप लुक नाही आणि तो मिळवण्याचा प्रयत्न देखील करायला नको. मला वाटतं या असंवेदनशीलतेबद्दल दीपिकाने माफी मागायला हवी कारण चुका माणसांकडूनच होतात.’

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत दीपिका तिच्या मेकअप आर्टिस्ट फॅबीला तिचे तीन आवडते लुक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज देते. त्यात ‘ओम शांती ओम’, ‘पीकू’ आणि ‘छपाक’ या तीन सिनेमातल्या तिने साकारलेल्या भूमिकांची ती नावं घेते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here