फुलंब्री पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. प्रियशरण महाराज यांच्यावरील हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, ‘आश्रमाचा दरवाजा तोडून सात ते आठ जण आतमध्ये घुसले. त्यांनी प्रियशरण महाराज यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.’ हल्लेखोरांनी आश्रमातील कोणतीही वस्तू चोरी केली नाही. त्यामुळे हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांनी महाराजांना मारहाण का केली, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकापासून काही अंतरावर लाडसावंगी रस्त्यालगत सताळा गावच्या हद्दीत डोंगरावर प्रियशरण महाराज यांचे आश्रम आहे. बुधवारी पहाटे काही जण त्यांच्या आश्रमात घुसले. त्यांनी महाराजांबद्दल तेथील सेवकांना विचारणा केली. त्यावेळी महाराज वरच्या मजल्यावर होते. तेथे जाऊन हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. तसेच धमकावले. महाराज यात जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुलंब्री पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times