नवी दिल्ली : केंद्रीय (Amit Shah) यांच्या अधिकृत अकाउन्टवर गुरुवारी फोटोऐवजी ‘एरर’चा ( profile photo error) मॅसेज दिसल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसहीत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अमित शहांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकाउन्टवर डिस्प्ले पिक्चर (DP) च्या ऐवजी ‘Media not displayed. This image has been removed in response to a report from the copyright holder’ असा एरर मॅसेज दिसत होता.

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरकडून अमित शहा यांचा प्रोफाईल फोटो ‘कॉपीराईट होल्डर’कडून रिपोर्ट करण्यात आल्यानंतर हटवण्यात आला होता.

वाचा : वाचा :

त्यानंतर काही वेळानं अमित शहांचा फोटो पुन्हा त्यांच्या अकाउन्टवर दिसू लागला. हा फोटो ट्विटरनं रिस्टोअर केला होता. ट्विटरकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘आमच्या ग्लोबल कॉपीराइट पॉलिसी अंतर्गत नकळत झालेल्या चुकीमुळे हे अकाउन्ट काही काळापुरतं लॉक करण्यात आलं होतं. परंतु, नंतर लगेचच ही चूक सुधारण्यात आली आणि आता अकाउन्ट पुन्हा सुस्थितीत काम करत आहे’.

‘सामान्यत: एखाद्या फोटोवर फोटोग्राफरचा अधिकार असतो, फोटोमध्ये दिसणाऱ्या विषय किंवा व्यक्तीचा नाही’ असं ट्विटरच्या कॉपीराईट पॉलिसीमध्ये म्हटलं गेलंय.

याच घटनेशी मिळती जुळती घटना काही वेळेपूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या (BCCI) ट्विटर हॅन्डलसोबतही झाली होती. कंपनीनं कॉपीराईटचं असल्याचं सांगत बोर्डाच्या अकाउंटचा डिस्प्ले पिक्चर (DP) हटवला होता.

वाचा : वाचा :

‘लेह’ प्रकरणी ट्विटरला केंद्र सरकारची नोटीस

या अगोदर, लेहबाबतच्या चुकीच्या नकाशाप्रकरणी साइट ट्विटर पुन्हा एकदा वादात अडकली आहे. लेहचा भाग हा लडाख या केंद्रशासित प्रदेशाऐवजी जम्मू आणि काश्मीरचा भाग दाखविण्यात आल्यानं सरकारनं ट्विटरला नोटीस पाठवली आहे. तसंच, प्रादेशिक अखंडतेचा अपमान केल्याबद्दल तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा करून पाच दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं. नंतर ट्विटरन त्यात बदल केले. परंतु, लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग दाखविण्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे, लेह हा अद्याप जम्मू आणि काश्मीरचाच भाग दिसत आहे.

‘लडाख केंद्रशासित प्रदेश असून, लेह त्याचे मुख्यालय असेल, हे भारतीय संसदेने जाहीर केले आहे. मात्र, लेह हा भाग लडाखऐवजी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखवून ट्विटरकडून प्रादेशिक अखंडतेचा अपमान करण्यात आला आहे. याबाबत, ट्विटर आणि प्रतिनिधींविरोधात कायदेशीर कारवाई का करू नये, याचे पाच दिवसांत उत्तर द्यावे. ट्विटरने याबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही, तर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ट्विटरचा अॅक्सेस बंद करणे, पोलिस तक्रार दाखल करणे यांसारखे अन्य पर्याय आमच्याकडे आहेत,’ असा इशाराही सरकारतर्फे देण्यात आला आहे.

यापूर्वीही ट्विटरने लेहला चीनचा भाग दाखविलं होतं. त्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर ट्विटरनं त्यात बदल केले. परंतु, लेहला केंद्रशासित प्रदेश लडाखचा भाग दाखविण्याची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे, लेह हा अद्याप जम्मू आणि काश्मीरचाच भाग दिसत आहे.

यापूर्वीच्या प्रकरणात ट्विटरवर लेहचे जिओ लोकेशन चीनमध्ये दिसत होते. त्या वेळीही भारताने देशाच्या प्रादेशिक अखंडतेचा अवमान करणारी कृती, सार्वभौमता आणि एकतेचा अवमान कदापी सहन केला जाणार नसल्याचं ठणकावलं होतं. गेल्या वर्षी पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून जम्मू आणि काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले आहेत.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here