लशीचा परिणाम काय?
फायजर कंपनी ही करोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित करत आहे. या लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्या एक ४४ वर्षीय स्वयंसेवक ग्लेन डेशील्ड्सने यांनी आपले अनुभव सांगितले. लस टोचल्यानंतर हँगओव्हर झाला असल्याचे भासू लागले. मात्र, ही स्थिती फार वेळ राहिली नाही. तर, आणखी एक ४५ वर्षी य स्वयंसेविकाने सांगितले की, लस घेतल्यानंतर तापासारखे साइड इफेक्ट जाणवले. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक ताप पूर्वीपेक्षा थोडा अधिक आला. त्याशिवाय डोकेदुखी, ताप, मांसपेशी दुखणे आदी लक्षणेही आढळून आली. या लस चाचणीत सहा देशातील ४३ हजार ५०० हून अधिकजणांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभाग नोंदवला.
वाचा:
वाचा:
अशी झाली लस चाचणी
ही लस चाचणी डबल-ब्लाइंड होती. या लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना लस दिली की नाही, याची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. चाचणीत सहभागी झालेल्यांपैकी निम्म्याच लोकांना लस देण्यात आली होती. प्रत्येक लस चाचणीत अशीच पद्धत वापरली जाते.
वाचा:
या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी सांगितले की, काही प्रमाणात साइड इफेक्टस जाणवले असले तरी करोनाला अटकाव घालण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे टाकण्यात आले आहे. या लस चाचणीत सहभागी होणे, आमच्यासाठी गौरवास्पद बाब असल्याची भावना स्वयंसेवकांनी व्यक्त केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times