म. टा. प्रतिनिधी, : मित्राने युवकाला पॉर्नसाईटवरील व्हिडिओ तुझाच पत्नीचा आहे असे सांगून त्याच्या कुटुंबीयांना व्हॉट्सवरून पाठवला. त्यानंतर तो पत्नीला त्रास देऊ लागला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कलाटेनगर, परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिचा पती आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला तिचा पती वारंवार चारित्र्याचा संशय घेऊन त्रास देत होता. त्यातच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पतीच्या मित्राने एक पॉर्न व्हिडिओ पीडितेच्या भावाला व्हॉट्सॲप वरून पाठवला. त्यानंतर हा व्हिडिओ घरातील अन्य सदस्यांनाही पाठवण्यात आला. पीडितेच्या पतीने हा व्हिडिओ तुझाच आहे, असे म्हणत पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी तिने दोघांविरोधात तक्रार केली. वाकड पोलीस ठाण्यातील फौजदार संगीता गोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोर्टातील खटला मागे घेण्यासाठी महिलेचे फोटो व्हायरल

कोर्टात सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी दोघांनी मिळून महिलेची सोशल मीडियावर बदनामी केली. पीडितेच्या वैयक्तिक फोटोंचा गैरवापर करण्यात आला असून, याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी मिलिंद शामराव बोरकर (वय ३८, रा. अंधेरी, मुंबई) आणि एका मोबाइल फोनधारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांचे एक प्रकरण न्यायालयात आहे. तो खटला मागे घेण्यासाठी आरोपींनी महिलेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी केली. त्यामुळे पीडितेने पोलिसांत फिर्याद दिली. पिंपरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here