नवी दिल्ली: देशात दिवाळीचे स्वागत होत असताना पाकिस्तानने (Pakistan) सीमेवर भ्याडपणे () करत विविध भागात गोळीबार केला. यात भारताचे ३ जवान शहीद (3 Jawans Martyred) झाले, तसेच ३ नागरिकही ठार झाले. पाकच्या या कृत्याचे भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे ७ ते ८ सैनिक मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचाही समावेश आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली. (at least 7 to 8 in the by )

भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे कमीतकमी १० ते १२ सैनिक जखमी झाले आहेत. या बरोबरच भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी बंकर ईंधन डंप आणि लॉन्च पॅड नष्ट झाले आहे.

पाकच्या गोळीबारात उरी सेक्टरमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू

उरी सेक्टरमध्ये नंबाला येथे भारताचे तीन जवान शहीद झाले. हाजी पीर सेक्टरमध्ये एका बीएसएफ इन्स्पेक्टरने देखील जीव गमावला.बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येच कामलकोटे येथे तीन नागरिक ठार झाले आहेत. यांपैकी एक महिला हाजी पीर सेक्टरच्या बालकोटे येथे मारली गेली. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

गोळीबार सुरू करून घुसखोरीचा प्रयत्न

उरीतील अनेक ठिकाणांव्यतिरिक्त बांदीपोरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरच्या इजमर्ग आणि कुपवाजा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने केरन सेक्टरमध्ये गोळीबार करत घुसखोरी करण्याचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. केरल सेक्टरच्या LOC वरील फॉरवर्ड पोस्टवर आमच्या जवानांनी काही संशयित हालचाली पाहिल्या. त्यानंतर सतर्क असलेल्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

क्लिक करा आणि वाचा-

भारतीय जवानांनी पाकचे बंकर, ईंधन डंप आणि लॉन्च पॅड केले नष्ट

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तोफगोळे आणि इतर हत्याराचांही वापर केला. मात्र भारतीय जवानांनी पाकला जशासतसे उत्तर दिले. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकर, ईंधन डंप आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here