अयोध्या, उत्तर प्रदेश : अयोध्येत शुक्रवारी कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. या दरम्यान ‘राम की पैडी’ एका वेगळ्याच ढंगात सजवण्यात आली होती. आणि दीपोत्सवामुळे आज अयोध्येत कित्येक वर्षानंतर एक वेगळंच दृश्यं पाहायला मिळालं. ()

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. यंदा सरयू नदीच्या तटावर ५.५१ लाख दिवे उजळून एक विश्व रेकॉर्ड प्रस्थापित करण्यात आला. अयोध्येत होणाऱ्या दीपोत्सव कार्यक्रमापूर्वी शोभा यात्रा काढण्यात आली. यंदा स्थळावरही ११ हजार दिवे पेटवण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं अयोध्येत राम मंदिराच्या बाजुने निर्णय दिल्यानंतर भव्य राम मंदिराच्या निर्माणाला सुरूवात झालीय.

वाचा : वाचा :

शुक्रवारी रामाच्या स्वागतासाठी भव्य रुपात नटली. या दरम्यान विशेष रंगांच्या दिव्यांच्या सजावटीसोबतच ‘राम की पैडी’वर रांगोळीनंही सजावट करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी इथे रामाचा राज्याभिषेकही केला. ( in Ayodhya For Deepotsav)

प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या विविध गाईडलाइन्सनंतरही हजारो भाविकांनी हे मनोहर दृश्य पाहण्यासाठी अयोध्येत गर्दी केली.

अयोध्येत दीपोत्सवापूर्वी रामाचा भव्य राज्याभिषेक करण्यात आला. पारंपरिक रुपातल्या या राज्याभिषेक सोहळ्यात आनंदीबेन पटेल यांनी राम आणि सीतेच्या रुपातील कलाकारांची आरतीही केली.

वाचा : वाचा :

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यातील अनेक मंत्र्यांसोबत राम, सीता आणि राम दरबाराची आरती केली. या दरम्यान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री महेंद्र सिंह हेदेखील उपस्थित होते. सगळ्यांनी राम, लक्ष्मण आणि माता सीतेचे आशीर्वादही घेतले.

आरतीपूर्वी राम आणि सीतेच्या रुपातील कलाकारांना विशेष राजकीय विमानाद्वारे अयोध्येतील राज्याभिषेक स्थळापर्यंत आणण्यात आलं. राज्याभिषेक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री योगींनी उपस्थित जनतेला संबोधित केलं.

अयोध्येला कोरिया, थायलंड, नेपाळ इत्यादी देशांना एका आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जोडलं जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केली. याशिवाय पुढच्या वर्षी तब्बल सात लक्ष दिव्यांनी अयोध्या नगरीला सजवण्यात येईल, असंही आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. भाविकांच्या श्रद्धेच्या सन्मानासोबतच पर्यटकांना भारताच्या प्राचीन परंपरेशी जोडण्याचं कामही राज्य सरकार करण्यार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here