मुंबई : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने युएईमधून येताना तब्बल एक कोटी रुपयांचे सोने आणि मौल्यवान वस्तू खरेदी केल्या होत्या. कृणालने जे युएईमधून सोने घेतले त्याची माहिती त्याने उघड केली नव्हती. त्यामुळे मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. पण आता कृणाल या प्रकरणातून सुटलेला नाही. कृणाल हा पुन्हा एकदा गोत्यात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. यासाठी त्याचे सोशल मीडियावरील खाते जबाबदार ठरू शकते, असेही म्हटले जात आहे. कृणाल सोशल मीडियामुळे कसा काय गोत्यात येऊ शकतो, पाहा…

कृणालने सोन्याबरोबर काही मौल्यवान गोष्टीही आणल्या आहेत, ज्यांची माहिती त्याने उघड केलेली नव्हती. कृणालने जी खरेदी केली होती ती नियमांमध्ये बसत नव्हती. त्यामुळे मुंबई विमानतळावर कृणालला महसूल संचालनालयने ताब्यात घेतले होते. पण आता सीमाशुल्क विभाग कृणालवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणाची फाईल बंद झालेली नाही. कारण सीमाशुल्क विभाग याबाबत आता पुढचा तपास करणार आहे.

कृणालला महागड्या घड्यांळांचा आणि सोन्याच्या दागिन्यांचा छंद आहे. आपल्या सोशल मीडियावर कृणालने काही पोस्ट केल्या आहेत, ज्यामध्ये महागडी घड्याळे आणि सोन्याचे दागिने पाहायला मिळत आहेत. आता कृणालचे सोशल मीडियावरील पोस्ट महसूल संचालनालय पाहणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा कृणालची चौकशी करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.

महसूल संचालनालयने ताब्यात घेतल्यावर कृणालला आपण नेमके काय काय खरेदी केले आहे, याची यादी द्यावी लागली. त्याचबरोबर जी नियमांमध्ये न बसणारी खरेदी होती त्याचा दंड त्याला भरावा लागणार आहे. सध्याच्या घडीला कृणालची तीन महागडी घड्याळं ही त्यांच्याकडेच आहेत, असे म्हटले जात आहे.

काय सांगतो नियम…जर पुरुष प्रवासी हा दुबईहून भारतामध्ये येत असेल तर त्याला फक्त २० ग्राम सोने आणता येऊ शकते. या सोन्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असून नये, असा नियम आहे. पण जर एखादी महिला दुबईहून भारतामध्ये येत असेल तर ती ४० ग्रॅम सोने आणू शकते, पण त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त असून नये, असा नियम आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here