सचिनने यावेळी आसाममधील करिमगंज जिल्ह्यातील माकुंडा हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी लागणारी चिकित्सीय उपकरणे दान केली आहेत. याचा सर्वात जास्त फायदा नवजात बालकांना होणार आहे. बाळाच्या प्रसूतीमध्ये काही वेळा समस्या जाणवते आणि त्यानंतर बऱ्याच वाईट गोष्टी घडतात. सचिनच्या या मदतीमुळे आता ही समस्या कमी होऊ शकणार आहे. त्यामुळेच सचिनची ही मदत मौल्यवान असल्याचे म्हटले जात आहे.
माकुंडा हॉस्पिटलचे बाल विशेषज्ञ सर्जन डॉ विजय आनंद इस्माइल यांनी यावेळी सचिनचे आभार मानले आहेत. यावेळी डॉक्टकांनी सांगितले की, ” सचिन तेंडुलकर आणि एकम या सेवाभावी संस्थेच्या मदतीने आमच्या हॉस्पिटलला मोलाची मदत झाली आहे. या मदतीमुळे आता गरीब लोकांना कमी पैशांमध्ये चांगला सुविधा मिळू शकतील, त्याचबरोबर वंचित कुटुंबांतील दोन हजारपेक्षा जास्त लहान मुलांना याची मदत होऊ शकते.”
करोना व्हायरसमुळे जेव्हा देशात लॉकडाऊन होते तेव्हा सचिनने ४ हजार गरीब लोकांना आर्थिक मदत केली होती. त्याचबरोबर पाच हजार कुटुंबियांची त्याने भोजनाचीही व्यवस्था केली होती. त्याचबरोबर सचिनने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५-२५ लाख रुपयांची मदतही केली होती.
सचिनने आर्थिकदृष्ट्या कमकूवत असलेल्या ५६० आदिवासी मुलांना मदत करण्यासाठी एका NGOसोबत काम केले होते. सचिनने एजीओ परिवार (NGO Parivaar) नावाच्या एका संस्थेसोबत मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यातील दुर्गम गावात सेवा कुटीरची निर्मिती केली आहे. मध्य प्रदेशमधील अशा आदिवासी मुलांना सचिनने मदत केली आहे ज्यांच्यामध्ये कुपोषण प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर त्यांना शिक्षणाची सोय मिळत नाही, असे एनजीओने म्हटले आहे. सचिन युनिसेफचा दूत आहे आणि सातत्याने मुलांच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत असतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times