भाजपनं शुक्रवारी ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रभारी तसंच सह-प्रभारींची यादी जाहीर केलीय. यात माजी केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह यांना उत्तर प्रदेशचं प्रभारी म्हणून घोषित करण्यात आलंय. राधा मोहन सिंह यांच्यासोबत उत्तर प्रदेशात तीन सह-प्रभारी नियुक्त करण्यात आलेत. यात सुनील ओझा, सत्या कुमार आणि संजीव चौरसिया यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षानं मणिपूरची जबाबदारी देत प्रभारी पद सोपवलं आहे. तर नलिन कोहली यांना नागालँडचं प्रभारी पद दिलं गेलंय.
वाचा : वाचा :
तरुण चुग यांना जम्मू काश्मीर, लडाख आणि तेलंगनाचं प्रभारी नियुक्त करण्यात आलंय. अरुण सिंह यांना कर्नाटकच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा
कैलाश विजयवर्गीय पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी कायम राहतील तसंच भूपेंद्र यादव यांना बिहारशिवाय गुजरातचीही जबाबदारी देण्यात आलीय. भूपेंद्र यादव यांना आणि गुजरात पोटनिवडणुकीत चांगलं काम करण्याचा फळ मिळालं, असं म्हणायला हरकत नाही.
आसामचे नेते दिलीप सैकिया यांना अरुणाचल प्रदेश आणि झारखंडचं प्रभारी पद सोपवण्यात आलंय.
दिल्ली भाजपचे नेते आणि हरयाणा राज्यसभा खासदार दुष्यंत कुमार गौतम यांना उत्तराखंड, पंजाब आणि चंदीगडची जबाबदारी देण्यात आलीय. तसंच व्ही मुरलीधरन यांना आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशचं प्रभारी पद देण्यात आलंय.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times