सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील येथे राहत्या घरात पती-पत्नीने एकाच वेळी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून, पत्नीची प्रकृती गंभीर आहे. (वय ३८) असे मृत पतीचे नाव आहे, तर (वय ३४) यांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ( Latest News Updates )

वाचा:

शिंदे दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच शेजारी राहणारे सुभाष शिंदे यांनी दोघांनाही उपचारासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी राजेंद्र शिंदे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले, तर पत्नी स्मिता यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मिरज येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिंदे दाम्पत्याने आत्महत्येच्या प्रयत्नाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजेंद्र शिंदे यांच्या पश्चात आई, वडील व एक लहान मुलगा आहे. कवठेमहांकाळच पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार अधिक तपास करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here